यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारे सोयाबीन कापूस पिके पूर्णपणे खराब झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक परिस्थिती ओढवली शेतकरी हवालदिल झाला आहे
शेतकरी संकटात सापडला आहे त्यांना आधार देण्यासाठी शिवसैनिकाना शेतकऱ्यांना दिलासा दया आम्ही आपल्या सोबत अहो असे आदेश शिवसैनिकांना पक्ष नेते मा एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिले मा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे मार्गदर्शनानुसार झरी तालुक्यातील तालुका प्रमुख बाळूभाऊ चेडे शहर प्रमुख नाना सुगंधे उपतालुकाप्रमुख विलास कसोटे प्रकाश जांभुळकर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपतग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व आम्ही शिवसैनिक आपल्या सोबत आहोत असा धीर देऊन शेतकऱ्याच्या बांधावर दसरा आसन साजरा करण्यात आला त्यावेळेस शेतकरी व शिवसैनिकामध्ये विचाराची देवाण-घेवाण करून सदैव आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे शिवसैनिकाकडून सांगण्यात आले त्यावेळेस शेतकरी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते
***दसरा बांधावर साजरा****
राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा दसरा मेळावा मुंबई, ठाणे,येथे मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील इतर सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आपापल्या भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांना धीर देऊन, त्यांच्यासोबतच दसरा साजरा करावा, असे भावनिक निर्देश त्यांनी दिले होते. याच निर्देशांचे पालन करीत झरी जामनी येथील शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धिरदेत आपली बांधिलकी जपली.**