***तालुका क्रिडा संकूल बांधकाम झरीलाच व्हावे या मागणील घेऊन आमरण उपोषण सुरू , उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली*

Z Plus News
0

 ***तालुका क्रिडा संकूल बांधकाम झरीलाच व्हावे या मागणील घेऊन आमरण उपोषण सुरू , उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली***

**तालुक्यातील क्रिडा मंडळ आक्रमक होण्याची संभावना**

झरी : झरी येथील बिरसा मुंडा चौक येथे तालुका क्रिडा संकल बांधकाम झरीलाच व्हावे या मागणीला घेऊन झरी वाशीयांकडून मोठा संघर्ष करीत असून हा संघर्ष आता टोकाला पोहचला आहे . या साठी शासन प्रशासनाचे उंबरठे झिजवीले आहे . शेवटचा पर्याय म्हणून चार दिवसापासून हे आमरण उपोषण सुर असून उपोषण कर्त्याची प्रकृती खालावली आहे . प्रशासनाने याकडे गांभीर्य दाखवीत नसल्याची खंत उपोषणकर्त्यानी खंत व्यक्त केली '. राजु ताडूरवार , मनोज पेन्दोर , हे दोघे आमरण उपोषणाला बसले असून ही मागणी जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे आमदार संजय देरकर हे उपोषण मंडपाला भेट देऊन ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे उपोषण कर्त्याचा सुर दिसला . या उपोषणाला काही सामाजिक व ईतर संघटनांचा पाठींबा असून झरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पाटण येथे  बांधकाम न करता तालुका मुख्यालयीच हे बांधकाम व्हावे अशी मागणी तालुका किडा संकूल बचाव कृती समिती झरी कडून तिव्र स्वरूपाची मागणी होत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)