**दूर्भा येथे एकाची क्रूर हत्या **
***आरोपी मोकाट**
झरी प्रतिनिधी
**झरी तालुक्यातील क्रूर हत्या ही पहिली**
**पोलिसा पुढे आरोपी पकडण्याचे आव्हान**
झरी तालुक्यातील पाटण पासुन ८ किमी अंतरावरील दुर्भा येथे अशोक दयालाल भेदोडकर यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान गळ्यावर धारधार शस्त्राने वार करुण जिवानिशी ठार मारल्याची घटना घडली. हि घटना दुर्भा रस्त्यावर असलेल्या गोटाळी नाल्याचे पुलाजवळ घडली . सदर घटनेची फिर्याद मृतकाचे चुलते सुखदेव भेदोडकर यांनी पाटण पोलीस स्टेशनला दिली . पाटण पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे . या बाबतीत अज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल केला असून ठाणेदार स्वप्नील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस अधीक तपास करून आरोपीच्या शोधात आहे .
