**उपोषणकर्त्याच्या समर्थकांचे आंदोलन पेटले, झरी येथे मंगळवार ला चक्काजाम आंदोलन

Z Plus News
0

 **उपोषणकर्त्याच्या समर्थकांचे आंदोलन पेटले, झरी येथे मंगळवार ला चक्काजाम आंदोलन*

    झरी प्रतिनिधी*


*  क्रीडा संकुल झरी येथेच व्हावे या रास्त मागणीकरिता बसलेल्या उपोषणकर्त्यांचा आज पाचवा दिवस. परंतु शासन प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल  घेतली नसल्यामुळे झरी येथील उपोषणकर्त्याना पाठिंबा दर्शविलेल्या सर्वसमर्थक  संघटनांनी व नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक, महिला बचत गट, विद्यार्थी संघटना व झरी येथील सेवाभावी संस्था यांनी तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला असून, मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 ला सकाळी 9:00 वाजेपासून चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. चक्काजाम आंदोलनात पांढरकवडा ते झरी, पाटण ते झरी व जामनी ते झरी हे तीनही मार्ग अडवले जाणार. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने  चक्काजाम आंदोलनात जनतेस होणाऱ्या त्रासास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील. मात्र वणी विधानसभेचे आमदार संजय भाऊ  देरकर यांनी वाटाघाटी करून आज मार्ग काढल्यास चक्काजाम आंदोलन टळणार असे मत  प्रतिनिधींशी बोलताना आंदोलकांनी मांडले. चक्काजाम आंदोलनात नगराध्यक्ष ज्योतीताई बीजगुनवार, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे, नगरसेविका सोनाली सोयाम, सुजाता अनमुलवार , रंजना नैताम, शीलाताई चौधरी, संगीता किनाके, कालिदास अर्के, शांतताई कापसे, गौरी मेश्राम, कुंदा मडावी, सुनिता मेश्राम, अंजना पेंदोर, ज्योती किनाके, वंदना गेडाम, नीता मांडवकर, कल्पना मडावी, मंजूषाकीनाके, मोरेश्वर कोडापे, रणधीर जुमनाके, महेश केराम, संजय कोडापे ,अॅड. दिपक काटकर, तुकाराम भाऊ आत्राम, पांडुरंग पोयाम, विठ्ठल काटकर, संभाजी पेंदोर, अनिल काटकर, आशिष सिडाम, रवी बाबू पश्चा, रमेश चौधरी, विठ्ठल उईके, मारोती कुसराम, बंडूभाऊ पारखी, बंडू आडे, बंडू सोयाम इत्यादी सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले जाणार.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)