शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची चौकशी करा***
Author -
Z Plus News
October 09, 2025
0
**शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची चौकशी करा***
** गवारा येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांना निवेदनातून मागणी**
झरी प्रतिनिधी ** झरी तालुक्यामध्ये मागील दोन महिन्यापूर्वी संसतधार पावसामुळे नदी नाल्याला महापूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून नदी नाल्या जवळील शेतकऱ्यांच्या जमिनी महापुरामुळे खरडून गेल्या असून त्या शेताची चौकशी करून योग्य नुकसान भरपाई मिळण्यात यावी याकरिता गवारा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार अक्षय रासने यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे
गवरा गावालगत नाला असून त्या नाल्याला मागील दोन महिन्यापूर्वी महापूर आला होता त्या महापुरात शेतकऱ्यांच्या पूर्णता शेतजमिनी खरडून गेले आहेत तसेच त्या महापुरामध्ये शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाईप शेतीसाठी उपयोग करणारे अवजारे पूर्णतः वाहून गेले शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये गाढ साचल्यामुळे विहिरी पूर्णता कोरड्या झाल्या आहे महसूल व कृषी विभागाकडून त्या नाल्यालगत शेतकऱ्यांच्या शेतीची चौकशी व पंचनामे करण्यात आले व काही शेतकऱ्यांच्या शेताची चौकशी सुद्धा करण्यात आले नाही तेव्हा पुन्हा शेताची चौकशी करून शासनाने मंजूर केलेले अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यात यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे त्यावेळेस निवेदन देताना गवरा येथील शेतकरी हरिभाऊ गुरणुले संजय कुरमचट्टीवार संदीप भोयर राजेश्वर शामलवार स्वामी मच्छवार हनुमंतु कुडमेथे दामोदर गुरनुले महादेव गुरनुले यशवंत गुरनुले प्रकाश गुरनुले राजेश्वर मच्छावार नंदू गुरनुले गजानन न्याहारे विजय गुरनुले प्रदीप प्रधान शंकर वाढई व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते