* राजेंद्र भोयर यांना नोटरी अधिवक्ता प्रमाणपत्र प्रदान**
Author -
Z Plus News
September 18, 2025
0
** ** राजेंद्र भोयर यांना नोटरी अधिवक्ता प्रमाणपत्र प्रदान**
झरी जामनी** झरी तालुक्यामध्ये दिवाणी न्यायालय असून तालुक्यातील नागरिक न्यायालयामध्ये येत असतात तसेच या न्यायालयामध्ये अधिवक्ता बरेच असून नोटरी अधिवक्ता नसल्याने शेतकऱ्यांना नागरिकांना कायदेशीर नोटरी करायची असल्यास वणी किंवा पांढरकवडा या ठिकाणी जाऊन नोटरी करावी लागत होती व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता परंतु झरी येथील अधिवक्ता श्री राजेंद्र विठ्ठल भोयर यांना नोटरी कायदा १९५२ (१९५२ चा ५३) अंतर्गत नोटरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि संपूर्ण झरी जामनीमध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी नोटरी अधिवक्ता म्हणून काम करण्यास अधिकृत करण्यात आले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील नागरिकांचा वेळ व पैसा नक्कीच वाचणार आहे