* गिरड येथे लोहार समाज संकल्पसिद्धी मेळावा संपन्न**
Author -
Z Plus News
September 01, 2025
0
* गिरड येथे लोहार समाज संकल्पसिद्धी मेळावा संपन्न**
प्रतिनिधी ***
लोहार समाज संकल्पसिद्धी मेळावा तथा विमूक्त भटके मूक्ति दिन श्रीराम मंदिर गिरड त समूद्रपूर जिल्हा वर्धा येथे संपन्न झाला आहे. या संकल्प सिद्धी मेळाव्याचे आयोजन श्री संदिपजी शिवणकर, वामनजी सूर्यवंशी, लोमेशजी झिंगरे, राजेश झिंगरे गिरड, गोपालजी बावणे, प्रल्हादजी गेडाम, तथा समूद्रपूर तालुका लोहार समाज संघटना यांनी केले होते
या संकल्प सिद्धी मेळाव्याचे अध्यक्ष अध्यक्ष श्री माणिकराव शेंडे साहेब सेवानिवृत्त विस्तार अधिकारी लाखनी, प्रमूख तसेच अतिथी श्री मधूकरजी शेंडे साहेब नागपूर, श्री ज्ञानेश्वरजी डहाके सर नागपूर, श्री केवळरामजी चौधरी साहेब नागपूर, श्री लोमेशजी झिंगरे जेष्ठ समाजसेवक गिरड, श्री दिनकरजी धानोरकर वर्धा जिल्हा प्रमुख मंचावर उपस्थित होते.
या लोहार संकल्पसिद्धी मेळाव्यात अनेक मान्यवरांनी समाज प्रबोधनपर विचार व्यक्त केले. समाज विकासाच्या संबंधाने अनेक संकल्प यामध्ये उपस्थित परिवर्तनवादी लोहार समाज बांधवांनी केले. त्यावेळेस लोहार समाजाच्या हितासाठी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये लोहार समाज चळवळ गावागावात घराघरात पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शासन व भारत सरकार यांच्या कडे समाज विकासाच्या मागण्या मागतांना सर्व प्रकारच्या आंदोलनांचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला.
वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाच्या शाखा प्रत्येक तालुक्यात व गावात निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.
संघटनात्मक संरचना बदलवून विस्तार व विकेंद्रीकरण पद्धतीचा अवलंब करण्याचा संकल्प करण्यात आला.*
सूशिक्षित व आर्थिक दृष्ट्या संपन्न समाजबांधव व तळागाळातील समाज बांधव यांच्या पर्यंत लोहार समाज चळवळ पोहचवण्याचा संकल्प केला.
महासंघाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.
अन्यायग्रस्त समाजबांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून समाज बांधवांचा आत्मविश्वास टिकवण्याचा संकल्प करण्यात आला.
जिल्हा स्तरावर लोहार समाज भवन निर्माण करण्यासाठी भक्कम प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला
विद्यार्थी व बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक व औद्योगिक शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला.
वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर च्या *कार्यालयाची इमारत मध्यवर्ती व मूख्यालय नागपूर येथे उभारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
तळागाळातील लोहार समाज बांधवांमध्ये अंतर्गत संस्कारात्मक व कौटुंबिक सूधारणा करण्याचा संकल्प करण्यात आला.
लोहार आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी रुपये मागणीसाठी भक्कमपणे पाठपुरावा करण्याचा संकल्प करण्यात आला.
विमूक्त भटके समाजासाठी शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या योजना लोहार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.
वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर मध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिला ब्रिगेड स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला.
लोहार समाजातील बेरोजगार तरुणांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी महासंघस्तरावर आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.
असे अनेक संकल्प या मेळाव्यात श्री प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर करण्यात आले..
या संकल्पसिद्धी मेळाव्यास अनेक परिवर्तनवादी लोहार समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश मेश्राम चिमूर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री लोमेशजी झिंगरे यांनी केले