** महसूल महा राजस्व अभियानात रस्ते मोकळे करून दुतर्फा झाडांची लागवट**
**
*१४५४ प्रमाणपत्र वाटप** नागरिकांना सनद व अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप**
झरी प्रतिनिधी **महसूल विभागामार्फत राज्यात १ ते ७ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत आहे. तहसील कार्यालय झरी मधील मुकुटबन सिबला झरी माथार्जुन खडकडोह मंडळ मध्ये महा राजस्व अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत असून या अभियानामध्ये तालुक्यातील नागरिक विद्यार्थी यांना उत्पन्न दाखले नॉन क्रिमिलियर आदिवासी प्रमाणपत्र जातीचे दाखले संजय गांधी निराधार प्रकरण शिधापत्रिका व इतर दाखले असे एकूण१४५४ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे व प्रमाणपत्र तहसीलदार श्री अक्षय रासने नायब तहसीलदार राजेंद्र मसराम नरेंद्र थोटे प्रीतम राजगडकर यांचे हस्ते वाटप करण्यात आले
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पादंनरस्ते महत्वाचा विषय असून अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. अनेक ठिकाणी यारस्त्यांवर लोकांनी अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाद विवादाचे प्रकरण तहसील कार्यालयामध्ये सोडविण्यासाठी नागरिकांनी तक्रार अर्ज करीत असतात शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे येण्यासाठी काही ठिकाणी संपूर्णपणे रस्ता बंद केल्याचे प्रकरण सुद्धा पाहण्यास मिळत आहे
तालुक्यात पाणंद रस्त्याची दैना अत्यंत वाईट असून शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू शेतामध्ये जाताना चक्क चिखल तुडवीत जावे लागते आहे या महसूल सप्ताहामध्ये झरी मंडल मधील दिग्रस ते पाटण मुकुटबन मंडल मधील हिरापूर ते राजुर सिबलामंडल मधील पारडी ते शिबला खडकडोह मंडळ मधील दाभाडी ते पांढरवानी व माथार्जून मंडल मधील वडगाव ते गवारा या शिवरस्त्याची मोजणी करून दुतर्फा झाडे लावण्यात आली
या महसूल राजस्व अभियान मध्ये भूमि अभिलेख कार्यालयाकडून तालुक्यातील नागरिकांना सनद वाटप करण्यात आले तसेच अतिक्रमण करीत असलेल्या शेतकऱ्यांना शेताचे पट्टे सुद्धा वाटप करण्यात आले या राजस्व अभियान अभियानामध्ये . मंडल अधिकारी सुभाष खैरे ऋषी राऊत मनोज चवरे मिलिंद घट्टे तलाठी मोबीन सिद्दिकी दामोदर इटनकर गणेश गुसिंगे राजू मोरे जगमित्र तूमरे बाळकृष्ण येरमे आशिष कुळमेथे वैभव गेडाम विकास टेकाम मनीषा बरंशेट्टीवार सुप्रिया सोयाम नीलम प्रांजले मोनिका सोमशेट्टीवार व तालुक्यातील कोतवाल या शिवाजी महाराज महा राजस्व अभियानामध्ये मोलाचे सहकार्य करीत आहे