*तहसील कार्यालय झरी सभागृहात महसूल दिवस साजरा*

Z Plus News
0

 


*तहसील कार्यालय झरी सभागृहात महसूल दिवस साजरा*

झरी प्रतिनिधी *

राज्यात महसूल दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत असून झरी तहसील कार्यालय सभागृहामध्ये महसूल दिवस साजरा करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार श्री अक्षय रासने यांचे हस्ते   उत्तम कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

१ ऑगस्ट महसूल दिन

महाराष्ट्र शासनाचा कणा .. महसूल विभाग सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला ख-या अथनि स्पर्श करणारा राज्याच्या गतीमान प्रशासनामध्ये सातत्याने अग्रभागी राहणारा नैसर्गिक आपत्ती असो वा निवडणूक अहोरात्र तळमळीने झटणारा राज्यापासून खेडेगावापर्यंत शासनाची धुरा सांभाळणारा शासनाच्या अनेक विभागांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदरनि करणारा ब्रिटिशकालापासून आजतागायत उत्साहाने, तडफेने, खंबीरप्रमाणे काम करणारा विभाग.. महसूल विभाग असून दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट 2025 पर्यंत महसूल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्या सात दिवसांमध्ये तालुक्यातील नागरिकांच्या समस्या चे निराकरण करण्यात येणार आहे त्या कार्यक्रमाचे स्वरूप  १ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात करण्यात आली असून २ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रमाची रूपरेषा आहे तसेच ३ ऑगस्ट रोजी शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे"व ४ ऑगस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय  राबविण्यात येणार आहे ५ऑगस्ट  ला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे" ६ ऑगस्ट शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे" ७ ऑगस्ट

"M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता याप्रमाणे महसूल सप्ताह मध्ये नागरिकांचे कामे करण्याचा संकल्प शासनाने केला असून या महसूल सप्ताहामध्ये तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या महसूल दिनी नायब तहसीलदार"श्री नरेंद्र थोटे,  , श्री मिलिंद घट्टे, मंडळ अधिकारी, श्री प्रविण नागतुरे, सहाय्यक महसूल अधिकारी, श्री अशोक पंधरे, महसूल सहाय्यक, श्रीमती नंदा मडावी शिपाई, श्री हेमंत गेडाम महसूल सेवक यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले त्यावेळेस नायब निवासी नायब तहसीलदार  प्रीतम राजगडकर, नायब तहसीलदार श्री राजेंद्र मसराम, महसूल  श्रीमती नम्रता पारतकर, निरीक्षण अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जा्गमित्र तुमरे, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले प्रास्ताविक. श्री प्रविण नागतुरे, सहाय्यक महसूल अधिकारी आभार प्रदर्शन.. सोमशेट्टीवर, ग्रा महसूल अधिकारी यांनी पार पडले या कार्यक्रमास 




सर्व कर्मचारी वृद, मंडळ अधिकारी, सहाय्यक मह अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक उपस्थित होते





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)