अडकोलीच्या सरपंच व सचिवाविरोधात पोलीस स्टेशनला महिलेची तक्रार
Author -
Z Plus News
July 09, 2025
0
*अडकोलीच्या सरपंच व सचिवाविरोधात पोलीस स्टेशनला महिलेची तक्रार*
** सार्वजनिक जागेचा वादावरून पोलीस स्टेशन येथे तक्रार*
झरी जामनी** झरीतालुक्यातील अडकोली येथे माता मंदिर सार्वजनिक जागेवर गावातील दोनव्यक्तींनी अतिक्रमण करून घर बांधकाम केल्यामुळे ज्या ठिकाणी घर बांधकाम करण्यात आलेत्या जागेचा गाव नमुना आठ-अ हे दस्त ऐवज मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेलेल्या महिलांना शिवीगाळ करत धक्का बुक्की देत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर हाकलून महिलांना अपमांस्पद वागणूक देणाऱ्या सचीवा व सरपंच विरोधात मुकुटबन पोलीस स्टेशनला एका महिलेने लेखी तक्रार केली आहे.
तालुक्यातील अडकोली ग्रामपंचायतीला प्रशांत नत्थुजी डोनेकर नामक ग्रामसेवक असून अशोक पंधरे हे या गावचे सरपंच आहेत या गावातील मातेच्या मंदिरासाठी असलेल्या खुल्या जागेवर गावातील दोन व्यक्तीने घर बांधकाम केले आहे. त्यामुळे त्या मंदिर जागेचा गाव नमुना आठ अहे दस्त ऐवज देण्यात यावे ही मागणी घेऊन काही महिला-पुरुष ४ जुलैला ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता
त्या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामसेवक व सरपंच यांनी मागणी करणाऱ्या महिला- पुरुष ग्रामस्थांवर चिडून महिलांना शिवीगाळ करून यातील पुष्पा जीवन जुमनाके (५०) या महिलेला धक्का बुक्क देत कार्यालयाबाहेर काढले आहे सार्वजनिक ठिकाण महिलांचा अपमान केला, मी ग्राम विस्तार अधिकार आहों तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी पोलीस स्टेशनला तक्रार देतो अशी धमकी देत आम्हाला हाकलून दिले आणि अधिकाराचा दुरुपयोग करीत जातीने परधान असणाऱ्या चार इसमावर खोर्ट तक्रार करून गुन्हे दाखल केले. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामस्थांनी मागतलेली माहिती न पुरवीत य सचिवानीच शासकीय कामात अडथळा निर्माण केल तसेच त्या रोजी हे सचिव दारू पिऊन कार्यालयात कामकाज करीत होते. त्यामुळे सामान्य नागरिक सोबत दादागिरी करणाऱ्या या ग्रामसेवका विरोधात हिंमत करून अडकोली येथील पुष्पा जीवन जूमणावे या महिलेने मुकुटबन पोलिस स्टेशनाला लेखी तक्रार दिली आहे. सरपंच व सचिव यांचेवर काय कारवाई करतील याकडे महिला तक्रारदार यांचे लक्ष लागले आहेत