**झरी तालुक्यातील शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा*
Author -
Z Plus News
July 08, 2025
0
**झरी तालुक्यातील शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा*
झरी जामनी** तालुक्यातील सर्व शिक्षक संघटेनामार्फत झरी तहसीलदार अक्षय रासने यांना ८ व ९ तारखेला शाळा बंद आंदोलनाबद्दल निवेदन देण्यात आले .
शासनाने अनेक वेळा आश्वासन दिली असली तरी प्रत्यक्ष अमंलबजावणी बाबतीत अजुनही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत . विशेषता टप्पा अनुदान संदर्भातील १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशानंतरही आर्थिक तरतुद न झाल्याने हजारो शिक्षक गेली १५ ते २० वर्ष अतिशय तृटपुंच्या वेतनावर विद्यार्थ्याचे अध्यापन कार्य पार पाडत आहे .
या पाश्र्वभूमीवर झरी शिक्षक समन्वय समीतिने दि . ८व ९ जुलै २०२५ रोजी शासनास पुर्वसुचना देत शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे .
शासन निर्णय व सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने संबंधीत आर्थिक तरतुद तात्काळ करावी . करीता झरीजामणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनास आमचा सक्रिय पाठींबा आहे .