** पोलीस स्टेशन मुकुटबन येथे तक्रार देत कार्यवाही करण्याची मागणी**
झरी जामनी--झरी जामनी तालुक्यातील अडकोली ग्राम पंचायत मध्ये माता मंदिर सार्वजनिक जागेचा आठ मागण्यासाठी महिला गेल्या असता त्या महिलेला धक्का बुक्की करून ग्राम पंचायत मधून काढण्यात आले त्या धक्काबुक्की करणाऱ्या अधिकारी व समंदीत व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता पोलीस स्टेशन मुकुटंबन येथे तक्रारदार पुष्पा जीवन कुडमेथे वय ५० यांनी तक्रार करून कारवाहीची मागणी केली आहे
मौजा अडकोली ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथे खुप जुने आई माताचे मंदिर आहे सदरहू मंदिराचे ग्रामपंचायत कार्यालयात नोंद आहे सदरहू जागेवर गावातील बल्की यांनी अतीक्रमण केले असून अतीक्रमणाची वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यासाठी आम्हाला नमुना आठ अ ची गरज असल्याने ग्राम पंचायत कार्यालयात पुष्पा जीवन कुळमेथे व गावातील महीला नामे अलका अनिल जुमनाके, सविता प्रविण कुडमेथे, कमलाबाई श्रीराम जुमनाके, कौशल्या महादेव जुमनाके व शुभांगी दिलीप जुमनाके यांनी जाऊन सचिव नामे प्रशांत नथ्थुजी डोनेकर आणी सरपंच अशोक सिताराम पंधरे व सदस्य वसंत सोनु टेकाम व विठ्ठल किसन मडावी हे हजर होते त्यावेळी सचिव व सरपंच यांना नमुना आठ अ ची मागणी केली असता ते दुसत्या चा आठ अ तुम्हाला देता येत नाही असे म्हटले त्यावेळी आम्ही सदरहू अतीक्रमणाची तक्रार करणार आहोत त्यामुळे आम्हाला आठ अ द्या तसेही आठ अ सार्वजनिक दस्त असल्याने ते कोणालाही देता येते असे म्हटले असता असता सरपंच व सचिव यांनी चिडून तुम्ही आम्हाला कायदा शिकविता का तुमच्या शी काय होते ते करुन घ्या असे म्हटले आम्ही आठ अ दिल्याशिवाय जात नाही अशी महिलांनी ताठर भूमिका घेतली असता सरपंच व सचिव मिळुन यांनी धक्काबुक्की केली अशी तक्रार करण्यात आली असून यावर सचिव यांच्यावर पोलीस विभाग काय कार्यवाही करतील याकडे तक्रारदार महिलांचे लक्ष लागले आहे