**राष्ट्रीय गाळीनधान्य अभियान प्रमाणित बियाणे वाटपात लापरवाही**
Author -
Z Plus News
July 21, 2025
0
**राष्ट्रीय गाळीनधान्य अभियान प्रमाणित बियाणे वाटपात लापरवाही** **शेतका-यांची फसवणूक **
**चौकशी करून समंदीत विभागातील अधिकारी कर्मचारी यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी**
झरी प्रतिनिधी
झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्टीय गळीत धान्य अभिमान प्रामाणिक बियानाकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनलाइन अर्ज केले परंतु बहुतांश शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही
बियाणे वाटपात लापरवाही करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी वणी विधानसभा युवा काँग्रेस अध्यक्ष राहुल
दांडेकर यांनीं नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांचे कडे कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे
शासनाने राबवलेल्या राष्ट्रीय गळीतधान्य व तेलधान्य अभियान प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम सन. २०२५-२६ अंतर्गत महा (MAHA-DBT) पोर्टल वर online अर्ज करणारे १५३ शेतकरी यांनी अर्ज योजनेकरिता पात्र झाले परंतु फक्त ९६ शेतक-याना बियाणे वाटप करण्यात आलेले दिसून येते अशातच उर्वरीत ५७ शेतक-याना या योजनेचा लाभ मिळाला नाही शेतक-यांनी वारंवार या बाबत कृषी कार्यालय व खरेदी विक्री कर्मचाऱ्यांना विचारना केली असता, त्याच्या कडून बियाणे २ दिवसात येईल ४ दिवसात येईल गाडी यवतमाळ व चंद्रपूर येथून निघाली असे उडवाउडवी चे उत्तर मिळत होते पेरणीची वेळ निघून जात होती अखेर शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन कृषिकेद्र.मधून बियाणे विकत घेतले मात्र योजनेअंतर्गत बियाणे शेतक-यांना मिळाले नाही, आणि संबंधीत विभागामार्फत व वाटप केलेल्या यंत्रणे मार्फत शेतक-यांची फसवणूक झाली. शेतक-यांना एन पेरणीच्या तोंडावर सावकारच्या पायापोटी लागून व्याजदराने बियाणे घेऊन पेरणी करावी लागली.
या संपूर्ण प्रकरणात शेतक-याची फसवणूक व थट्टा करणा-यांवर या संबंधित बियाणे वाटप प्रकरणात दिरंगाई व लापरवाही करणा-यांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे त्यावेळेस सरपंच संघटनेचे अध्यक्ष निलेश एलटीवार राजू उपरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती झरी
रामकृष्ण कुडमेथे अविनाश डुकरे आसिफ कुरेशी लोकेश शिरपूरकर प्रदीप गारघाटे नंदकिशोर रोगे श्रीकांत अनमूलवार शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते