*सरकार व प्रशासनाचा निषेध, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या, शेतक-यांचे प्रश्न, शहरातील समस्या इत्यादींवर वणीत बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार व प्रशासनाचा निषेध केला.
दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
वणी विधानसभा क्षेत्रात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, रांगणा-भुरकी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने विहिरीचे बांधकाम करून या योजनेला एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे. प्रत्येक वॉर्डला दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करावा. शहर व ग्रामीण भागात खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज द्यावी, पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करावी, खते, बि-बियाण्यांचे दर कमी करावे, घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत.
पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कुठे अपु-या पावसामुळे तर कुठे पूर व अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वणीकरांना भर पावसाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. नळाला येणारे पाणीही स्वच्छ नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. शेतकरी, कष्टकरी व वणीकरांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू. जर या समस्या सुटल्या नाही तर काँग्रेसतर्फे यापेक्षा मोठे आंदोलन केले जाईल.
-**संजय खाडे, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस***
आंदोलनात नरेंद्र ठाकरे, देविदास काळे, प्रशांत गोहकार, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर ओम ठाकूर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, उत्तमराव गेडाम, सुरेश रायपुरे, तेजराज बोढे, संगीता खाडे, नीलिमा काळे, वंदना आवारी, सविता रासेकर, साधना गोहकार, शारदा ठाकरे, अनंत डंबारे, अशोक चिकटे, रवी कोटावार, अनंत चौधरी, जगदीश चौधरी, राजू अंकितवार, डेव्हिड परकावार, अंकुश मापूर, प्रवीण बद्दमवार, आकाश बदकी, यादवराव काळे, विनोद गोडे, बापूराव चिनावार, संतोष आत्राम, लक्ष्मण खडसे, राजू पाटणकर, प्रेमनाथ मंगाम, प्रमोद लोणारे, सुरेश बनसोड, प्रफुल्ल उपरे, हाफिस शेख, रवी धानोरकर, हरिभाऊ काकडे, प्रवीण वैद्य, सोमनाथ मंगाम, राकेश खुराना, गौरीशंकर खुराना, धनराज सातपुते, मुरलीधर ठाकरे, भीमराव चिडे, प्रफुल्ल विखनकर, वसंता आसुटकर, नंदू आसुटकर, रवी धानोरकर यांच्यासह वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते. या आंदोलनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवचेतना मिळाली आहे.