** सीनियर कराटे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेत घवघवीत यश

Z Plus News
0

** सीनियर कराटे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेत घवघवीत यश**

यवतमाळ प्रतिनिधी


यवतमाळ*: मान्यताप्राप्त कराटे शैली जापान शोतोकान कराटे-डो कानिन-जुकू ऑर्गनायझेशन इंडिया व यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने यवतमाळ येथे कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षाचे आयोजन करण्यात आले होते. जपान शोतोकान कराटे डू कनिंनजुकु ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर व अध्यक्ष जागतिक कराटे महासंघ (डब्लू के एफ) चें A ग्रेड पंच हांशी परमजीत सिंग ठाणे यांच्या मार्गदर्शनात शिहान डॉ.प्रा.आनंद एस.भुसारी ५ th डॅन ब्लॅक बेल्ट राष्ट्रीय जज आणि पंच यांच्या निरीक्षणात जिल्ह्याच्या कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा पार पडली डॉ. भुसारी यांनी प्रशिक्षणार्थ्याचे कर्तब तपासून त्यांची ग्रेडेशन परीक्षा घेतली त्यात सर्व प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले.

नुकतेच संपन्न झालेले कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षा मध्ये सीनियर कराटे प्रशिक्षक सेन्साई योगेश बाबाराव पडोळे व नितेश प्रभू पाली यांनी सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट (निदान) तर हितेश गोपाळराव नागभीडकर, आर्यन किशोर जाधव व कबीर प्रदीप तूपट यांनी फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट (शोदान) प्रतियोगीतेमध्ये यश प्रतीपादन केले. यावेळी यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. प्रकाश नंदुरकर, डॉ.नितीन कोथळे, महेंद्र पाखरे, अविनाश लोखंडे , मोहम्मद हाफिज शेख यांनी सीनियर कराटे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)