*दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा*

Z Plus News
0

 *दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा*

***

झरी प्रतिनिधी



झरी तहसील कार्यालयामध्ये दहशतवाद व हिंसाचार दिवस साजरा करण्यात आला नयब तहसीलदार श्री राजेंद्र मसराम यांचे कडून दहशतवाद विरोधात कर्मचाऱ्याकडून शपथ घेण्यात आली त्यामध्ये सर्वांनी आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणा-या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु. याप्रमाणे शपथ घेण्यात आली त्यावेळेस नायब तहसीलदार श्री नरेंद्र थोटे तहसील कार्यालयातील कर्मचारी आसिफ शेख अशोक पंधरे विजय सुत्रावे नारायण मसराम गजानन मडावी राजू करनेवार प्रवीण नागतुरे चेतन कुडमेथे तलाठी मोबीन सिद्दिकी दयाकर शेरकुरवार बाबू व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)