** विद्यार्थ्यांनी या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार अक्षय रासने यांनी केले आहे**
झरी प्रतिनिधी झरी जामनी तालुक्यातील राजीव कला महाविद्यालय सूर्य तेज महाविद्यालय आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन आदर्श हायस्कूल मुकुटबन शासकीय आश्रम शाळा येथे दिनांक 22 5 2025 रोज मा. आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांनी दिलेले निर्देशानुसार
, शाळा /विद्यालय/महाविद्यालयामध्ये पहिल्या टप्यात इयता ११ वी मधीलशालेय विद्यार्थ्यांची दिनांक २२/०५/२०२५ रोजी जातीचे प्रमाणपत्र वितरित करून अमल बजावणी करण्याकरिता कॅम्प राबविण्यात येत असून
तालुक्यातील सेतू केंद्र व CSC धारक यांना शालेय विद्याथ्यांना दाखले, जात प्रमाणपत्र वितरीत करण्याकरीता दिनांक २२/०५/२०२५ रोजी शिबीरामध्ये घेण्यांत येणा-या नियोजन करण्यात आलेले आहे त्याबाबत आपले शाळेचे विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, नॅन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, सेन्ट्रल कास्ट, वय अधिवास, वय राट्रियत्व, उत्पन्न दाखला, हे सर्व प्रमाणपत्र करिता लागणारे कागदपत्र गोळा करण्याबाबत सूचना तहसीलदार अक्षय रासने यांच्याकडून देण्यात आले आहे
नियोजित कार्यक्रमानुसार संबंधित सेतु केंद्र चालक यांना खालील प्रमाणे नेमून दिलेल्या कॅम्प च्या ठिकाणी विहित दिनांक २२/०१/२०२५ रोजी वेळेवर हजर राहावे. सदर कॅम्प यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रथम प्राधान्य देण्यात यावे. याकरिता राजीव कनिष्ठ महाविद्यालय पाटण येथे दिलीप अलगोटवार सूर्यतेज कनिष्ठ महाविद्यालय झरी येथे अमोल पुंडलिक मंचलवार आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन मोहन दिनकर मल्लुरवार शासकीय आश्रम शाळा सिबला येथे विक्रम रामराव राठोड व विक्रांत कोटपिल्लीवार म राजीव कनिष्ठ महाविद्यालय मांडवी हर्षल नंदकुमार अग्रवाल बालाजी कनिष्ठ महाविद्यालय माथार्जुन राजीव कनिष्ठ महाविद्यालय मनीषा चिंतकुठलावार
या सेतू केंद्र चालकाची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी शालेय उपयोगी कागदपत्र प्रमाणपत्र काढण्यात यावे असे आवाहन तहसीलदार अक्षय रासने यांनी आवाहन केले आहे