** क्यू आर कोड वाचनालयाचे उद्घाटन*

Z Plus News
0

 


** क्यू आर कोड वाचनालयाचे उद्घाटन**

झरी जामनी**

आज महाराष्ट्र राज्य दिनाच्या 65 व्या वर्धापन समारंभ दिन 01 मे 2025 रोजी मा. श्री. अक्षय रासने, तहसिलदार झरी जामणी यांचे शुभहस्ते QR – कोड वाचनालयाचे उद़घाटन समारंभ पार पाडण्यात आला. यामध्ये QR – कोड वाचनालय फलकाची फित कापुन अनावरण करण्यात आले. 

 सदर QR – कोड वाचनालय फलकामध्ये महसुल विषयक विविध पुस्तकांचा QR कोड टाकरण्यात आला असुन यामध्ये प्रामुख्याने कायदा माहितीचा अऩ अभिव्यक्ती स्वातंत्याचा, महसूल प्रश्नोत्तरे, महसूली लेख, ऑनलाईन 7/12, महसूल न्यायालय, वारस नोंदी, जनमाहिती अधिकारी, तलाठी कामकाज मार्गदर्शन, फेरफार तसेच महसूल संलग्न कायदे इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. तसेच शासनाच्या वेगवेगळया वेबसाईट व त्यांचे QR – कोड  देण्यात आले आहे त्यामध्ये आपली चावडी, डिजीटल स्वाक्षरीत उतारे, बिना-स्वाक्षरीत उतारे, भु-नकाशा, ई-हक्क, ई-पिक पाहणी यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अजुन शासन आपल्या मोबाईवर या मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे Youtube व्हीडीओच्या माध्यमातून सोप्या भाषेतुन माहिती देणा-या Youtube चॅनलचा समावेश करण्यात आलेला आहे. च्या उद्घाटन प्रसंगी निवासी नायब तहसीलदार प्रीतम राजगडकर राजेंद्र मसराम नरेंद्र थोटे शेषराव रिठे माजी सैनिक अशोक पंधरे रविंद्र मोकासे प्रवीण नाग तुरे विजय सुत्रावे स्वप्निल मुळे गजानन मडावी नारायण मेश्राम वसंता मडावी राजू करणेवार पोलीस पाटील विनोद पेरकवार तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी


  महसूल कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)