** जिल्हाधिकारी यांचेकडे केली निवेदनातून चौकशीची मागणी**
झरी प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास प्रकल्प झरी जामनी कडून तालुक्यातील गावांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांकरिता निवेदन मागविण्यात आले तालुक्यातील पदे रिक्त असलेल्या गावातून अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता अंदाजे प्रत्येक गावामधून सहा ते दहा अर्ज एकात्मिक बाल विकास प्रकल्प झरी जामणी सादर करण्यात आले
सादर केलेल्या अर्जाची तपासणी प्रकल्प अधिकारी यांच्याकडून करण्यात आली व गुण देण्यात आले व काही अर्ज बात करण्यात आले
तालुक्यातील अर्ज कर्त्यांनी आपल्याला गुण कमी का देण्यात आले याविषयी अनेक तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे करण्यात आल्या परंतु त्या तक्रारी तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून अडकली येथील सविता विलास सुरपाम यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे झरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता अर्ज भरलेल्या सर्व अर्जाची फेर तपासणी समितीकडून करण्यात यावी व नव्याने नियुक्ती करण्यात यावी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता देवाणघेवाण करून आर्थिक व्यवहार करून नियुक्तीपत्र देत असल्याचा आरोप सदर महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आला आहे