झरी तालुक्यातील 54 ग्रामपंचायत चे आरक्षण सोडत संपन्न*
*
** सर्वसाधारण आरक्षण 23 पैकी 16 महिला**
** अनुसूचित आरक्षण 24 पैकी 12 महिला**
**नामाप्र साठी आरक्षण 03** अनुसूचित जाती 02** अनु जमाती 02 **
झरी प्रतिनिधी
तालुक्यातील 54 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयातील सभागृहांमध्ये पार पडले
या सरपंच आरक्षण सोडती करिता झरी तालुक्यातील गाव पुढारी व सरपंच पदाचे स्वप्न पाहणारे कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते आरक्षण सोडतीमध्ये अनेकांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे
आगामी काळामध्ये होत असलेल्या जरी तालुक्यातील 54 ग्रामपंचायतचे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार 2025 निवडणूक करिता आरक्षण आले तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये तहसीलदार अक्षय रासने व नायब तहसीलदार नरेंद्र थोटे निवडणूक विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत आरक्षण सोडत घेण्यात आली या आरक्षण सोडतीत काही गावातील पुढारी यांनी आरक्षण बाबत तक्रारी केल्या त्या तक्रारदारांचे म्हणणे लेखी स्वरूपामध्ये घेण्यात आले आहे आहे
------------------------------ ------------------------------ ----
अनुसूचित क्षेत्राकरिता एकूण 24 ग्रामपंचायत असून त्यापैकी 12 ग्रामपंचायत ह्या महिला सरपंचाकरिता वाढोणा बंदी* कारेगाव* सुसरी* गवारा* निंबादेवी* मांडवी* मांडवा* चिचघाट* झमकोला* मारकी( बु)** अडकोली* व उमरी *या ग्रामपंचायत महिला करिता राखीव करण्यात आल्या आहे
मूळगव्हाण दाभाडी सुरला चिखलढोह मांगुरला (बु) पांढरवानी निमणी दाभा सिबला हिवराबारसा माथार्जुन खरबडा ग्रामपंचायत सुद्धा अनुसूचित क्षेत्राकरिता राखीव करण्यात आल्या आहे
------------------------------ ------------------------------ -----
