** दुचाकीची समोरासमोर धडक . दोघे जखमी**
**एकाच ठिकाणी दोन अपघात**
झरी :- मुकुटबन वणी मुख्य मार्गावरील पुरड व चंडकापुर या गावादरम्यानच्या मध्ये असलेल्या वळणरस्त्या वर मुकुटबन कडून वणी कडे हिरो होंडा स्प्लेंडर एम एच बी यु 8002 या गाडीने जात असलेले ऋषीकेश मद्दीकुंटावार वय 25 रा .मांगली व गंगारेड्डी बच्चेवार वय 60 रा . मुकुटबन यांच्या दुचाकी ला समोरून येणाऱ्या पल्सर एम एच 40 बी आर 0116 या गाडीने जोरात धडक दिल्याने दोघेही जखमी झाल्याची घटना घडली . यावेळी घटनास्थळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी 108 या गाडीला पाचरणा केली गाडीला वेळ झाल्याने त्या घटनास्थळी वाहनाची मोठी गर्दी झाली होती
वणी कडून मुकुटंबन कडे जात असलेल्या एम एच 34 बी जी 8777 या ट्रकने घटनास्थळी उभ्या असलेल्या मारुती सुझुकी सेलेरिओ एम एच 29 एडी6646 या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागून धडक दिल्याने त्या गाडीचे नुकसान झाले घटना स्थळी दुहेरी अपघात झाल्याने त्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्वाण झाली होती त्या अपघात ग्रस्त व्यक्तींना अम्बुलंसने वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असे बोलले जात आहे



