** परिवहन मंत्र्यांनी यावर उपाय योजना करण्याची प्रवाशांकडून मागणी*
झरी प्रतिनिधी **महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची बस सेवा महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये सेवा देत असून त्यामध्ये अनेक वजन व परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे व महाराष्ट्राच्या अनेक आगारांमध्ये नव्याने बस सेवा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांमध्ये आनंदचे वातावरण दिसून येत आहे शासनाने महिलांकरिता तिकीट दरामध्ये सवलत दिल्याने प्रवासामध्ये महिलांचे प्रमाण वाढले असून शासनाला सुद्धा मोठा महसूल मिळाला आहे मात्र प्रवासी एसटी बसणे प्रवास करताना सुट्या पैशावरून नेहमीच महाराष्ट्रामध्ये प्रवासी व वाहक यांच्यामध्ये नेहमी वाद होतात व चिल्लर पैशावरून मारामारीचे प्रमाण सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे
पांढरकवडा व वनी आगाराच्या बस झरी जामणी या आदिवासी तालुक्यांमध्ये सेवा देण्याचे काम नियमित होत असून तिकीट दरामध्ये दोन किंवा तीन रुपये असे चिल्लर देताना कधी कधी प्रवासी वर्गाकडे उपलब्ध रहात नाही व वाहकाकडे प्रवाशांना परत पैसे देताना उपलब्ध राहत नाही तेव्हा त्यांच्यामध्ये तोंडा तोंडी भांडणे नेहमी होत असतात
झरी जामनी तालुक्यातील शिंदे गटातील पदाधिकारी पांढरकवडा येथून यवतमाळ कडे जात असताना पांढरकवडा ते यवतमाळ तिकीट दर 122 रुपये असून त्या पदाधिकारी व वाहकांमध्ये दोन रुपयावरून वादविवाद झाले आहे त्या पदाधिकाऱ्याकडे दोन रुपये सुटे नसल्याने पन्नास रुपये वाहकाकडे असे एकूण 150 रुपये देण्यात आले वाहकाकडे चिल्लर नसल्यामुळे सदर टिकीटच्या मागे 28 रुपये लिहून दिले पदाधिकारी हे गडबडीत असल्याने उर्वरित पैसे घेण्याचे विसरलेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असे प्रत्येक दिवसाला प्रकरण घडत असतात तेव्हा शासनाने चिल्लर तिकिटाचे दर ठेवण्यात येऊ नये सरसकट ठेवण्यात यावे असे मागणी प्रवासी वर्गाकडून व पदाधिकाऱ्याकडून होत आहे तेव्हा परिवहन मंत्री यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे