केंद्र माथार्जुन, पं. स. झरी (जा.) अंतर्गत जि.प. शाळा, लालगुडा पोड येथे दि. १९/४/२०२५ रोजी शिक्षकांची "शिक्षणपरिषद" घेण्यात आली. सदर शिक्षण परिषदेत 'निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम' अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे उद्दिष्ट विहित कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्याविषयी (शि. वि. अ.) श्री.निलेश खैरनार व श्री. मोहन काटकर (शि.वि.अ.) यांनी मार्गदर्शन केले.
श्री. मोहन काटकर (शि.वि.अ.) हे याच शाळेत प्र.मु.अ. तथा याच केंद्राचे केंद्रप्रमुखही होते. त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे याच केंद्रातील मांडवा येथील शाळेतील प्र. मु.अ. नितिन जाधव सर हे पं. स. नेर येथे शि. वि. अधिकारी म्हणून रुजू झाले. म्हणून त्यांचाही केंद्रातील संपूर्ण शिक्षक तथा पं.स झरी(जा.) येथील दोन्ही (शि.वि.अ.) यांनी जाहिर सत्कार केला.
केंद्रातील शिक्षक श्री. सुधाकर अनाके, सचिन लोहकपूरे, नितिन टिंगणे सरांनी अप्रगत विद्यार्थ्यांकरिता शाळेत राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाविषयीची माहिती दिली. केंद्रातील सर्व (मु.अ.) नी स्कूल मॅपिंग ची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करून शिक्षण परिषदेला हजेरी लावली.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. कृष्णा नुगुरवार सरांनी केले. सूत्रसंचालन श्री. सचिन बोंद्रे सरांनी व आभार प्रदर्शन श्री. शंकर दोडके सरांनी केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मू.अ. श्री. गजानन इरले सर, नानू मेश्राम, विलास किनाके, रामभाऊ आत्राम , कोटरंगे सरांनी परिश्रम घेतले.
शिक्षण परिषदेची सांगता वंदेमातरम् गीतांनी करण्यात आली