तालुका क्रीडा संकुल झरी उपोषणकर्त्यांना पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल वीस सामाजिक संघटना व महिला बचत गटांचा पाठिंबा.

Z Plus News
0

 

तालुका क्रीडा संकुल झरी उपोषणकर्त्यांना पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल वीस  सामाजिक संघटना व महिला बचत गटांचा पाठिंबा.
** झरी प्रतिनिधी **क्रीडा संकुल झरी मुख्यालयीच बांधण्यात यावे. यां न्यायीक मागणी करिता तालुका क्रीडा संकुल बचाव कृती समितीच्या वतीने दिनांक 15 जानेवारीपासून उपोषणास सुरुवात झाली. सोशल मीडिया  व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण झरी तालुक्यात पसरलेल्या बातमीचा इफेक्ट विविध सामाजिक संघटना व महिला बचत गटाच्या समर्थनार्थ दिसून आला. या उपोषणकर्त्यांना झरी तालुक्यातील तब्बल वीस महिला बचत गट व सामाजिक संघटनांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी समर्थन दर्शविले. सर्वप्रथम झरी तालुका कोलाम समाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास समिती, जंगोम दल, उत्कर्ष भावी संस्था निमनी, बिगर सातबारा शेतकरी संघटना, संकल्प महिला बचत गट, त्रिमूर्ती महिला बचत गट, दीक्षा समूह महिला बचत गट ह्या सारख्या दशकाहून अधिक महिला बचत गटांनी उपोषणकर्त्याच्या न्यायीक मागणीस समर्थन दिले.  झरी येतेस क्रीडा संकुल बांधण्यात यावे असे ठाम मत समर्थक  सर्व संघटना व महिला बचत गटांनी नोंदवहीत प्रकर्षाने नोंदविले. आमरण उपोषण सभा मंडपी झरी तहसीलचे नायब तहसीलदार नरेंद्रजी थोटे व नायब तहसीलदार   प्रीतम राजगडकर साहेब निवासी नायब तहसीलदार यांनी यासंदर्भात भेट घेऊन उपोषणकर्त्याची समज काढण्याचा प्रयत्न केला. वणी विधानसभेचे आमदार व जिल्हा क्रीडा अधिकारी सभामंडपी येऊन जोपर्यंत क्रीडा संकुल झरी येथेच बांधण्याची प्रत्यक्ष लेखी  देनार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालतच राहील. असे ठाम मत उपोषण कर्ते राजू ताडुरवार व मनोज पेंदोर यांनी स्पष्टपणे मांडले. पोलीस स्टेशन पाटणचे पीएसआय व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी भेटी देवुन उपोषणकर्त्याच्या प्रकृतीची तपासणी केली. संपूर्ण झरी तालुक्यातूनच सदर उपोषणकर्त्यास समर्थन मिळत आहे. यावरून हळूहळू क्रीडा संकुल झरी येथेच बांधण्यात यावे ही न्यायीक मागणी  संपूर्ण झरी तालुक्यात जोर धरताना दिसते आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)