क्रीडा संकुल झरी- उपोषणकर्त्यास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट** नगरपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व विविध सामाजिक संघटनेनी भेट देऊन क्रीडा संकुला बाबत साधली चर्चा*** झरी येथेच क्रीडा संकुल बांधण्यासंदर्भात लेखी मिळेपर्यंत आमरण उपोषण कायम**

Z Plus News
0

 **

क्रीडा संकुल झरी- उपोषणकर्त्यास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट** नगरपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व विविध सामाजिक संघटनेनी भेट देऊन   क्रीडा संकुला बाबत साधली चर्चा*** झरी येथेच क्रीडा संकुल बांधण्यासंदर्भात लेखी मिळेपर्यंत आमरण उपोषण कायम**

झरी जांमनी झेड प्लस न्यूज  ***

क्रीडा संकुल झरी येथेच बांधण्यात यावे या स्पष्ट मागणीकरिता बसलेल्या उपोषणकर्त्यांची  माजी आमदार संजय रेड्डी बोदकुरवार दिनेशभाऊ जयस्वाल  नगराध्यक्ष ज्योतीताई बिजगुणवार, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर कोडापे, नगरसेविका सोनाली सोयाम, सुजाता अनमुलवार माजी नगरसेविका शांताबाई कापसे, श्रीराम मेश्राम, प्रविण लेनगुळे, संगीता किनाके व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळचे वतीने चैताली राऊत यांनी भेट देऊन आमरण उपोषण मागे घेण्यासंदर्भात चर्चा केली.  याप्रसंगी आमदार संजय भाऊ देरकर यांच्याशी उपोषणकर्त्याच्यावतीने दयाकर गेडाम व दत्ता परचाके यांनी मोबाईलवरून वार्तालाप साधला. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणी वरती ठाम राहून लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण कायम राहील अशी भूमिका स्पष्ट मांडली. तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, वैद्यकीय अधिकारी  कुडमेथे, भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद पिंपळकर, आदिवासी एकता परिषद जिल्हा यवतमाळ चे कार्यकारी सदस्य नंनू भाऊ कोडापे, अखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेचे कार्यकारी सदस्य पांडुरंग पोयाम, सामाजिक कार्यकर्ते बंडू पारखी, झरी न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष . ऍड दिपक काटकर,  सरकारी वकील अॅड. कपूर, अॅड. ताडशेट्टीवार,  अॅड. भोयर  अॅड. मदिकुंटावार,अॅड. कुंटावार, डॉक्टर नेताजी पारशिवे,  संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्यकारणीचे सदस्य व विद्यार्थी युवा मंच झरी, स्वामी समर्थ महिला बचत गट व महिला बचत गट झरी यांनी सुद्धा उपोषणकर्त्यास समर्थन देऊन क्रीडा संकुल झरी येथेच बांधण्यात यावे. या मागणीला समर्थन दर्शविले. त्यावेळेस गंभीर भाऊ मुके बंडू सोयाम विठ्ठल भाऊ उईके.  व क्रीडा संकुल बचाव समितीचे कार्यकर्ते व झरी नगरवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)