झरी जामनी*** आगामी निवडणूक वणी आर्णी चंद्रपूर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टी चे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रतिभाताई धानोरकर हे निवडणुकीमध्ये उभे असून दोन्ही पक्षाकडून प्रचार चालू असून प्रचार हा अंतिम टप्प्यावर आलेला आहे या प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने तळागाळातील कार्यकर्ते जोमाने प्रत्येक गावात घरोघरी जाऊन ताईच्या प्रचारात मग्न असून ताई या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये प्रचाराची मोहीम हाती घेतल्याचे दिसून येत आहे या प्रचारात भारतीय जनता पार्टी चे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जाहीर सभेमध्ये वादग्रस्त विधान केल्यामुळे या मतदार संघामधील मतदारांनी भाऊ कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे दोन्ही पक्षाचा प्रचार हा अंतिम टप्प्यावर आला असून या प्रचारामध्ये ताईंनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे व निवडणुकीमध्ये सुद्धा बाजी मारतील अशी चर्चा मतदारांमध्ये चहापान टपरीवर रंगतदार चर्चा चालू आहे
सुधीर भाऊ मुनगंटीवार त्यांचा सुद्धा या मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार चालू असून भा ज पा कार्यकर्ते भाऊंना विजय कसा खेचून कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करीत असून मतदार राजा कोणाकडे कौल देतील हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतर कळेल