****तहसील कार्यालयात समन्वय कार्यशाळा संपन्न*
झरी जामणी , : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अॅक्सिस बँक फाउंडेशन व भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशन आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ (GSMT ) संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय झरी जामणी येथे तहसिलदार एम. एस.रामगुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी,APO रोहयो,कृषी विभाग,ग्रामसेवक,वन विभाग, जलसंधारण विभाग, रेशीम विभाग, इत्यादी विभागाचे अधिकारी व GSMT संस्थेचे श्रीकांत लोडाम सर व विभागीय व्यवस्थापक सतीश माकोडे सर यांची उपस्थिती होती. या प्रकल्पासाठी यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्याची निवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश रोहयो अंतर्गत भूपृष्ठावरील सिंचन सुधारणे, भूजल पुनर्भरण वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारने असून गाव पातळीवर रोहयोची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध विभागामार्फत योजना राबविल्या जातात. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी HIMWP प्रकल्प टीम झरी जामणी यांनी सहकार्य केले.
