बोदकुरवार यांची तिसऱ्यांदा आमदारकीकडे वाटचाल

Z Plus News
0

 मतदार जातीपातीपेक्षा विकास कामांना प्राधान्य देतील

बोदकुरवार यांची तिसऱ्यांदा आमदारकीकडे वाटचाल 

झरी जामणी : भाजपाचा प्रचार दररोज कार्यकर्त्यांकडून तालुक्यात जोरात सुरू असून आज सोमवार ११ नोव्हेंबर संजीवरेड्डी बोदकुरवार यांचाझरी जामणी तालुक्यात सकाळी ७:३० वाजता गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडत, मुकूटबन पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा, येदलापूर, लिंगटी, धानोरा, रायपूर, दुर्भा, खरबडा, पाटण, दिग्रस, सुर्दापूर, कमळवेल्ली, सतपल्ली, उमरी, अहिरल्ली, दाभा, टाकळी असा प्रवास करीत वठोली येथे प्रचाराची सांगता झाली. हजारो समर्थकांनी प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेत समर्थकांनी जोरदार नारेबाजी करीत रॅलीत जल्लोषाचे वातावरण तयार केले. 


 लोकसभा निवडणूक प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काही उमेदवार जातीचा फॉर्म्युला ठरवून विधानसभेच्या पायऱ्या चढण्याचा स्वप्न बघत आहे. मात्र वणी विधानसभेचा इतिहास बघितला तर येथील मतदार जातीपातीपेक्षा विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अल्पसंख्यक समाजाचे काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी चार वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. तर संजीवरेड्डी बोदकुरवार यांची सलग तिसऱ्यांदा आमदारकीकडे वाटचाल आहे. मुकूटबन येथील मुस्लिम कब्रस्थानमध्ये ७० लाख रुपयाची विकासकामे करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मुस्लिम समाजातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हार घालून सत्कार केले व निवडणुकीत जिंकण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या निवडणुकीत जातिपातीचा फॉर्म्युला ठरणार फेल ठरणार असून बोदकुरवार यांची तिसऱ्यांदा आमदारकीकडे वाटचाल आहे अशा जनतेत चर्चा आहे. 


यावेळी प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, झरी (जामनी) भाजप तालुकाध्यक्ष सतीश नाखले, खरेदी विक्री संघ अध्यक्ष मुन्ना बोलेनवार, सुरेश मानकर, धर्माजी आत्राम, पं.स.चे माजी सभापती राजेश्वर गोंड्रावार, भाजप नेते अशोक बोदकुरवार, बंडू वरारकर, माजी तालुकाध्यक्ष संजय दातारकर, शाम बोदकुरवार, माजी पं.स.सभापती लता आत्राम, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांता जिवतोडे, माजी सरपंच शंकर लाकडे,  ग्रा. पं. सरपंच मिना आरमुरवार, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)