झरी जामनी**दि.08/02/ 2024 रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना काही इसम गोवंशीय जनावरे पायी आंबेझरी ते शिबला रस्त्याने तेलंगाना राज्यात कत्तली करिता घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळल्यावरून त्यांनी पाटण पोलीस स्टेशन चे ठाणेदार व पोलीस अंमलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कडील अंमलदार यांचे पथक तयार करून पाटण व मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीवरील आंबेझरी-शिबला जंगल परिसरात रवाना केले. त्यावरून पोलिस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन तीन इसमांना 17 गोवंशीय जनावरांसह पकडले व त्यांची विचारपूस केली असता सदर इसमांनी ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे सदरचे 17 गोवंशीय जनावरे कत्तलिकरीता विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.त्यावरून पोलिसांनी सदर तीन इसमांना 2,12,000/- रुपये किमतीच्या जनावरांसह ताब्यात घेतले व जनावरे चैतन्य गोरक्षण ट्रस्ट मांडवी येथे दाखल केले. जनावरे पायी घेऊन जाणारे मजूर व त्यांचे मालक अशा एकुन 06 आरोपी नामे 1) मंगेश रामकृष्ण मेश्राम रा.माथार्जुन 2) सदाशिव गोविंदा मडावी रा.माथार्जुन 3)प्रवीण शंकर दुधकर रा.सुसरी 4)शेख नजीर शेख हसन रा.पाटनबोरी 5)फकीर मोहम्मद शेख बशीर रा.मारेगाव 6)शेख जमीर शेख रहमान रा.पाटनबोरी या आरोपींना विरुद्ध पोलीस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर जनावरांना गोरक्षण ट्रस्ट येथे दाखल करण्यात आले
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनात पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अंमलदार विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे,अतुल अमोल नुन्नलवार,सुरेश राठोड, अमित पोयाम, प्रशांत तलांडे, हेमंत कामतवार, रतिष वानखेडे, यांनी केली.