** रेती तस्कर व इतर गुन्ह्यातील आरोपी दोन वर्षाकरिता हद्दपार *

Z Plus News
0

 


** रेती तस्कर व इतर गुन्ह्यातील आरोपी दोन वर्षाकरिता हद्दपार ** **यवमताळ जिल्हा पोलीसांची कारवाई.**


झरी जामनी**झरी तालुक्यातील पोलीस ठाणे पाटण हद्यीतील ईसम नामे. नवन उर्फ नविन अशोक बद्यमवार वय २८ वर्षे रा. दुर्भा ता.झरीजामणी जि.यवतमाळ याचा गुन्हेगारी अभिलेख सन २०१९ पासुन असल्याने व त्याचे विरुध्द शासकिय कामात अडथळा निर्माण करणे, अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे व रेती चोरी सबंधानेचे व अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयासह दखलपात्र गुन्हे नोंद असल्याने व त्याचे पासुन सर्व सामाण्य जणतेच्या जिवीत्वास व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने त्याचे विरुध्द सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. पाटण यांनी हद्यपारीचा प्रस्ताव तयार करुन मा.पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांचे मार्फतीने सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, केळापूर यांचे कडे सादर केला होता. सदर प्रस्तावास सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, केळापुर यांनी मंजुरी देवुन त्यास यवतमाळ जिल्हयातुन दोन वर्ष कालावधी करीता हद्यपार करण्या बाबतचा आदेश दिनांक ३१/०१/२०२४ रोजी पारीत केला आहे.


जिल्हयात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होवुन त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याने अशा प्रकारे शरीराविरुध्द व संपत्ती विषयक गुन्हे करणारे, अवैध रेती तस्करी, गावठी दारु तसेच टोळीने दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांवर आगामी काळात MCOCA तसेच MPDA, महाराष्ट्र पोलीस कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असुन अशा गुन्हेगाराची गय केली जाणार नाही.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, उप विभागिय पोलीस अधिकारी, पांढरकवडा श्री. रामेश्वर वेंजने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.श्री. आधारसिंग सोनोने, सहा. पोलीस निरीक्षक पाटण श्री. संदिप पाटील, तसेच पोउपनि धनराज हाके, पोहवा बालाजी ठाकरे, राहुल गोरे, पोना राम पोपळघट सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)