झरी प्रतिनिधी--झरी तालुक्यातील शिबला येथे महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर संपन्न झाले आहे
श्री अमित रंजन (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर यांचे मार्गदर्शणात तहसिलदार श्री. अक्षय रासणे यांचे आदेशाने व नियोजनाने शिबला येथील महा राजस्व अभियान समाधान शिबिरामध्ये सिबला मंडळ सर्कल मधील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र; उत्पन्न दाखले; अधिवास प्रमाणपत्र; राशण कार्ड चे वाटप करण्यात आले शिबीरा मध्ये संजय गांधी विभाग पुरवठा विभाग निवडणूक विभाग; आधार ऑपरेटर; दाखले अपडेट सहकार सेवा ... केंद्र चालक; आरोग्य विभाग, व एकात्मीक अदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाच्या वेळी नरेन्द्र थोटे नायब तहसीलदार सौ रजनीताई तोडासे सरपंच ग्रा. प. सिबला: नम्रतालाई पारसकार पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री मिलींद घट्टे मं. अ. शिबला. श्री महादेव शिंदे, काशीबा पाईकराव, प्रियंका आडे, संदीप सोयाम; संदिप शेळके श्री रवींद्र पाटील ग्रामसेवक हजर होते. परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते