** पाटण येथे पाण्याची भीषण पाणीटंचाई**
** पाटण येथे पाण्याची भीषण पाणीटंचाई**
** आठ दिवसापासून पाण्याविनाच**
झरी प्रतिनिधी
झरी तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या पाटण गावातील नागरिकांना पाण्याचा भीषण सामना करावा लागत आहे मागील आठ दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकंती करावी लागत आहे
आठ दिवसापासून पाण्याची टंचाई असून सुद्धा कोणतीही उपाययोजना केली असल्यामुळे नागरिक ग्रामपंचायत प्रशासनातील कर्मचाऱ्यांना व सदस्यांना संतप सवाल करीत असून याकडे मात्र ग्रामपंचायत सरपंच सचिव व सदस्य दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे
तालुक्यातील बाजारपेठ व मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत कडून पाण्याची व्यवस्था म्हणून गावामध्ये पूर्वीपासून मोठ्या पाण्याच्या टाक्या आहे व त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पैनगंगा नदी पात्रामधून पाटण येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये आणले जाते प्रत्येक घरी पाणी पुरवल्या जात होते परंतु मागील आठ दिवसापासून नदीपात्रात गाड असल्याचे सांगून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार ग्रामपंचायत कडून होताना दिसून येत आहे
ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही टँकरची सुविधा करण्यात आली नाही गावामध्ये खाजगी पाणी टँकर असून त्या खाजगी पाणी टँकरने स्वतः करिता व वार्डातील काही नागरिकांसाठीच पाणी मिळत आहे
पाटण येथील घरगुती खाजगी बोरवेल ला सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये पाणी नसल्याने त्यांना सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी टंचाईची उपाययोजना का करण्यात आली नाही? ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी पाटणवासीयां कडून होत आहे