**पाटण येथे पाच दिवशीय श्रीराम जन्मोत्सव व भव्य यात्रेचे आयोजन
Author -
Z Plus News
April 04, 2025
0
**पाटण येथे पाच दिवशीय श्रीराम जन्मोत्सव व भव्य यात्रेचे आयोजन
**
झरी जामनी* :दरवर्षीप्रमाणे पाटण येथे श्रीराम जन्मोत्सव व यात्रेची आयोजन करण्यात आलेली आहे. दिनांक ५ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने रोज भव्य मिरवणूक 'जागोजागी पथनाट्य, भजन ,कीर्तन व धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे . दि . पाच तारखेला सायंकाळी पाच ते १० वाजे पर्यंत भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . मागील वर्षी हा दिपोत्सव लक्ष वेधून घेणारा व चर्चेचा विषय ठरलेला होता .या ही वर्षी या उत्सवाच्या निमित्ताने पाटण व परिसरातील महिला पुरूष या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे . हा उत्सव हनुमान मंदिराचे पटांगणात श्रीराम जन्मोत्सव समिती, व पाटणवाषीया तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे . या उत्सवाला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे यात्रेकरूंनी आपले तंबू व साधन संसाधने उभारले असून लहान मुलांपासून तर इतर सर्व वयोगटातील लोकांना मनोरंजन व इतर बाबींचा लाभ या यात्रेच्या निमित्ताने घेता येणार आहे . या श्रीराम जन्मोत्सव व यात्रेसाठी बहुसंख्य भाविक भक्तांनी महिला पुरुषांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायत पाटण , श्रीराम जन्मोत्सव समिती पाटण व पाटण वाशियाकडून करण्यात आलेले आहे .