**पाच दिवसानंतर अखेर उपोषण मागे***
** क्रीडा संकुल झरी मुख्यालही व्हावे ही एकमेव मागणी मान्य**
** आमदार संजय देरकरांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे**
झरी जामणी ** झरी येथे क्रीडा संकुल बचाव समितीतर्फे दिनांक १५/१/२०२५ पासून वीर बिरसा मुंडा चौकामध्ये आमरण उपोषण चालू होते उपोषणामध्ये पाटण येथे क्रीडा संकुल बांधकाम होणार असलेले क्रीडा संकुल झरी मुख्यालयी बांधण्यात यावे ही एकमेव मागणी घेऊन झरी येथील राजू तांडूरवार व मनोज पेंदोर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली
त्या उपोषणाला तालुक्यातील सामाजिक संस्था पत्रकार संघटना महिला बचत गट नगरपंचायत व विविध संघटनेने पाठिंबा दर्शविला होता उपोषणाला पाच दिवस झाले तरी आमदार संजय भाऊ देरकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत आमदार महोदय लेखी स्वरूपात मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र घेतला होता आमदार महोदय उपोषणाच्या ठिकाणी आले नसल्याने दिनांक १९/१/२०२५ रोजी उपोषण करता राजू तांडूरवार यांनी टोकाची भूमिका घेत झरी येथील बी एस एन एल टावर रात्री आठ वाजता चढून शोले स्टाईल आंदोलन केले ही बाब तालुक्यातील नागरिकांना माहिती होताच हजारो समर्थक घटनास्थळी पोहोचले ही बाब आमदार संजय देरकर यांना माहिती होताच ठीक साडे नउ वाजता घटनास्थळी पोहचून उपोषणकर्त्याची एकमेव मागणी लेखी स्वरूपात मान्य केली त्यावेळेस नायब तहसीलदार नरेंद्र थोटे ठाणेदार स्वप्निल ठाकरे क्रीडा संकुल बचाव समितीचे पदाधिकारी नगराध्यक्ष ज्योती संजय बीजगुणवार व नगरसेवक नगरसेविका व झरी येथील नगरवासी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
