* उपोषणकर्ता बी एस एन यल टॉवरवर**
** आमदार साहेब येणार कधी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय*
झरी प्रतिनिधी ** झरी तालुका क्रीडा संकुल बचाव समिती कडून दिनाला१५/१/२०२५ पासून झरी येथील मुख्यालयी क्रिडा संकुल व्हावे या करिता उपोषण चालू असून आज उपोषणाला पाच दिवस पूर्ण झाले तरी मा आ संजय देरकर यांनी उपोषण मंडपाला भेट सुद्धा दिली नाही आ साहेबाचे कार्यकर्ते यांनी आमदार साहेब येणार आहे असे बोलत होते तरी दोन दिवसांपासून आमदार साहेबांनी भेट दिली नाही त्यामुळे उपोषण कर्ता राजू ताडुरवार यांनी झरी येथील बी एस एन एल ऑफिसच्या टॉवरवर चढून असून जो पर्यंत आ देरकर साहेब येणार नाही तो पर्यंत खाली येणार नाही असा पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे बीएसएनएल टॉवरच्या खाली नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे
उपोषण कर्त्या वेळ 8 वाजतापासून टॉवरवर चडून असून 1 तास झाला तरी आमदार साहेब आले नसल्याने झरी तालुकावशी आक्रमक भूमिकेत दिसत आहे
महत्त्वाची बाब म्हणजे त्या उपोषण मंडपामध्ये पोलीस विभागाचा कर्मचारी रात्रंदिवस मंडपात असणे गरजेचे आहे तेव्हा उपोषण करता उपोषण मंडपा मधून थेट बी एस एन एल टावर वर चढला आहे तेव्हा उपोषण मंडपामध्ये असणारे पोलीस कर्मचारी कुठे गेले हा प्रश्न झरी तालुका वाशियामध्ये चर्चेचा विषय झाला आहे