**जिल्हा परिषद शाळा जामनी येथे बालक दिन साजरा.*
**माननीय न्यायाधीश एस. एस. काळे विद्यमान न्यायालय झरी जामनी यांनी साधला बालकांशी संवाद.*
झरी जामनी *प्रतिनिधी ** स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी येथे बालक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माननीय न्यायाधीश एस. एस. काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी मोबाईलचे वेड सोडून मैदानी खेळाची कास धरावी. नियमित खेळ व व्यायाम यामुळे सुदृढ शरीर व विचारप्रवण मेंदू विकसित होण्यात मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप खेळावे व खूप अभ्यास सुद्धा करावा असे प्रतिपादन केले. न्यायालय झरी जामणी येथील सरकारी वकील अॅड. कपूर साहेब, अॅडवोकेट मदिकुंटावार साहेब अॅडवोकेट बोथले साहेब यांनी बालकांचे हक्क, कायदेविषयक अधिकार आपल्या वक्तृत्वातून बालक दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी अॅडवोकेट ताडशेट्टीवार साहेब व विद्यमान न्यायालयातील कर्मचारी श्री. निशांत पौणीकर, श्री डी. बी. आडे, श्री प्रकाश बारेवार, श्री सुधाकर टेकाम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी कुमारी श्रेया चाटारे व तृप्ती बुद्धेवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री श्याम शेटिये तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सुवर्णा अक्कलवार, स श्री आकाश पेंदोर, श्री पुरुषोत्तम पंधरे सर, अंगणवाडी शिक्षिका श्रीमती ताडूरवार, सेविका सौ. मंचलवार, शालेय पोषण आहार कर्मचारी रेखाताई जिड्डेवार, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू वितरित करण्यात आल्या.