*वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम* *जाती महासंघ नागपूर निवडणूक व- निकाल संपन्न

Z Plus News
0


 *वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम* *जाती महासंघ नागपूर निवडणूक व- निकाल संपन्न**

**२९ पदाकरिता ३७  उमेदवार रिंगणात**

**२१ उमेदवाराची अविरोध निवड**८ पदाकरिता गुप्तपणे मतदान**

*वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर ची त्रैवार्षिक निवडणूक दि.२/११/२०२५ रोज रविवार ला अध्यापक भवन गणेशपेठ नागपूर येथे पार पडली. धर्मादाय आयुक्त यांनी दि.१८/६/२०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अँड. सौरभ राऊत यांनी लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया दि.२/११/२०२५ रोज रविवार ला नागपूर पार पाडली. निवडणूकीची मतमोजणी त्याच दिवशी करून निवडणूकीचा निकाल जाहीर केला व निवडणूक प्रमाणपत्र विजयी उमेदवारांना वितरित केले. निवडणूक प्रक्रियेत ३९ सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील दोन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. ३७ उमेदवार २९ पदांकरिता. निवडणूकीच्या रिंगणात होते.त्यापैकी २१ उमेदवार अविरोध निवडून आले. ८ पदांकरिता प्रत्यक्ष गूप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. महासंंघाचे अध्यक्ष म्हणून श्री मधूकरजी शेंडे नागपूर , उपाध्यक्ष श्री प्रमोद मेश्राम नागपूर,हे अविरोध निवडून आले. कार्याध्यक्ष श्री माणिकराव शेंडे लाखनी, सचिव श्री जितेश मेश्राम चिमूर, उपाध्यक्ष क्र.२ श्री आनंद बावणे चंद्रपूर, उपाध्यक्ष क्र.३ श्री अनिल मेश्राम गोंदिया, कोषाध्यक्ष श्री केवळराम चौधरी नागपूर, जिल्हा प्रमुख गडचिरोली श्री वासूदेव शेंडे चंद्रपूर, सल्लागार क्र.१ श्री राजेश सोनटक्के चंद्रपूर, महिला सदस्य क्र.१ सौ अनिता गाताडे चंद्रपूर यांची प्रत्यक्ष मतदानाने निवडणूक घेण्यात आली व विजयी झाले. मतदान प्रक्रियेत ४९ मतदारांपैकी २९ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. महासंघाच्या घटनेनूसार ३७ पदांपैकी २९ पदांवर नेमणूक करण्यात आली. उर्वरित ८ पदे रिक्त आहेत. निवडणूकीत परिवर्तन पैनल चे २७ उमेदवार विजयी झाले.  श्री मांडवगडे गटातील २ उमेदवार अविरोध निवडून आले.*

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)