*पाटण युवा बॅचमेट्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन संपन्न
झरी जामणी : तालुक्यातील पाटण येथे युवा बॅचमेट्स क्रिकेट टूर्नामेंटचे उद्घाटन १८ ऑक्टोंबर रोजी जय बजरंग मैदानावर झाले. या स्पर्धेचे उद्घाटन विनोदाबाई गोविंद शेरकुवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रत्नमाला विजय लक्षशेट्टीवार, आराध्या मुकेश जयस्वाल होत्या. उद्घाटन प्रसंगी गावातील १९८४ ते २००८ या सर्व बॅचमेट्ससह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सकाळी १० वाजता उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आलेली ही स्पर्धा दि. १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत रंगणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावातील विविध संघ सहभागी होऊन मैत्री, खेळाडूवृत्ती आणि एकतेचा संदेश देणार आहेत. संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि एकजुटीने होणारी ही टूर्नामेंट पाटण गावासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे. जय बजरंग मैदानावर होणाऱ्या सामन्यांना गावकऱ्यांचा आणि तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, पाटणमध्ये सध्या क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे.
सोबत फोटो आहे

