शिवसेना उ बा ठा गटाकडून तहसील कार्यालयात काळी दिवाळी साजरी**

Z Plus News
0

 *


शिवसेना  उ बा ठा  गटाकडून तहसील कार्यालयात काळी दिवाळी साजरी**

**चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी**

** अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात**


झरी प्रतिनिधी **आज राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने दिवाळी हा सण साजरा केल्या जात असून या दिवाळी सणाकरिता राज्यातील नागरिक पूर्व तयारी करून सन उत्साहामध्ये साजरा करीत असतात 

वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकऱ्या शेतकऱ्यांना मात्र हा सण तहसील कार्यालयामध्ये ठेचा व भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आर्थिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात यावे यासाठी ऐन दिवाळीच्या दिवशी नायब तहसीलदार श्री प्रीतम राजगडकर यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे

राज्यामध्ये अतिवृष्टी झाली असून यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातामधील येणारे सोयाबीन व कापूस पिके पूर्णतः उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून आंदोलने करण्यात आली परंतु सरकारने हेक्टरी 18 हजार पाचशे रुपये देऊन सांत्वना केली असून हेक्टरी अनुदान जरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झाले नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना व शिवसैनिकांना तहसील कार्यालयामध्ये काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ सरकारने आणली असून या सरकारचा त्या ठिकाणी शेतकरी व शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला


सरकारने दिवाळीपूर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी अनुदान जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले असताना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नाही तसेच सामूहिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडून तलाठी हजार 2 हजार रुपये घेऊन खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18500 रुपये अनुदान जमा होण्याऐवजी आठ हजार रुपये अनुदान जमा झाले परंतु बँक बंद असल्यामुळे पैसे काढायचे कसे हा एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे

शेतकरी कष्टकरी बळीराजा हा नेहमी भाजी भाकर खाऊन उपजीविका करीत असतो  दिवाळीच्या दिवशी काहीतरी गोडधोड करून सण साजरा करण्याची इच्छा असते सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी पूर्व अनुदान जमा केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाजी भाकर खाण्याची वेळ सरकारने आणली आहे असे मत सह संपर्कप्रमुख श्री संतोष माहुरे यांनी झुणका भाकर आंदोलनाच्या वेळी मत  व्यक्त केले त्यावेळेस शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश आदेवार. जिल्हा वाहतूक सेना सचिव विनोद उपरवार. तालुका सचिव अशोक पंधरे .संदीप विंचू तालुका संपर्कप्रमुख .दयाकर गेडाम तालुका संघटक. सिताराम पिंगे तालुका समन्वयक आत्माराम नखाते तुळशीराम दुर्गे .बंडू पारखी. दुषंत उपरेउपतालुकाप्रमुख. संजय बीजगुनवार शहर प्रमुख. नेताजी पारखी. विजय पानगंटीवार .शिवशंकर ठाकरे. अनिल डेगरवार. शेख हसन. शेख अमन शेख सुनिल  मानकर. किशोर माहुरे. अमोल सोयाम. राहुल  मानकर. शेख गप्पूर शंकर काळे लक्ष्मण उलमाले संतोष नेलावार गौरव पंधरे श्री कुनघाटकर तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)